कुक्कुट हा एक संस्कृत शब्द असून त्या शब्दाचा अर्थ कोंबडा असा होतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार दोन पायावर उभ्या असलेल्या कोंबड्यासारखा दिसतो म्हणून या आसनाला कुक्कुटासन असे म्हणतात. या आसनालाच इंग्रजी मध्ये Cockerel Pose असे म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे आपल्या दोन्ही हातांच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो आणि ते मजबूत बनतात. तसेच मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना होणारे विविध त्रास सुद्धा या आसनाच्या सरावामुळे कमी होतात. चला तर मग कुक्कुटासन कसे करायचे आणि त्यापासून मिळणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
![]() |
Image source: https://pixahive.com/photo/kukkutasana-cockerel-pose/ |
कृती:
- सर्वप्रथम आपल्या आसनावर(yoga mat) पद्मासनात बसा.
- आता आपले दोन्ही हात आपल्या मांडी आणि पोटऱ्यांच्या मध्ये घालावेत आणि आपले हाताचे तळवे जमिनीवर टेकवावे. आकृतीत दाखवल्या प्रमाणे आपल्या हातांची बोटे समोरच्या बाजूलाअसावीत व त्यामध्ये पुरेसे अंतर असावे.
- आता एक खोल श्वास घेऊन आपल्या शरीराला दोन्ही हातावर उचलून तोलण्याचा प्रयत्न करा.
- स्थुल व्यक्तींना असे करण्यास थोडा त्रास होऊ शकतो परंतु नियमित सराव केल्यास हि कृती सहज शक्य होऊ शकते.
फायदे:
- या आसनाचा दैनंदिन आपले मन शांत राखण्यास मदत करते तसेच आपला उत्साह वाढवतो व टिकवून ठेवतो.
- मासिक पाळीच्यावेळी स्त्रियांना होणारी बैचेनी व ओटी पोटात दुखणे या सारखे त्रास या आसनाच्या सरावाने कमी होते.
- या आसनाच्या सरावामुळे दोन्ही हातांचा भरपूर व्यायाम होतो तसेच हातांच्या संपूर्ण सांध्यांना याने पूर्ण व्यायाम मिळतो.
- ज्यांना पोटातील कृमींचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत लाभदायक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts please let me know.