कटी म्हणजेच कंबर, या आसनाच्या सरावामुळे कमरेला भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे आसनाचे नाव कटिआसन (Katiaasana) असे आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे कमरेचे सर्व विकार दूर होतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे आसन खूप मदतगार आहे. हे आसन करण्यास थोडे अवघड आहे परंतु जर आपण नियमित सराव केला तर आपण हे आसन सहज करू शकू. image source : https://www.flickr.com/photos/murrey123/4437890830 कृती: आपल्या आसनावर पाठीवर झोपा. शरीर पूर्ण सैल सोडा. आता दोन्ही पाय हळूहळू वर घ्या. पाय वर घेतल्यानंतर डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा व उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. वरील आकृतीत दाखविल्या प्रमाणे दोन्ही पाय ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. कंबर व डोके जमिनीला टेकलेले राहूद्या व श्वास आत खेचा. सुरुवातीला हे आसन आपण १० सेकंदापर्यंत करू शकतो. सुरुवातीला हे आसन दररोज चार वेळा करावे. फायदे: या आसनाच्या नियमित सरावामुळे खांदे व फुफ्फुसे मजबूत बनतात. या आसनाच्या सरावामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे हृदयरोगास प्रतिबंध घालता येतो. कमरेचे सर्वप्रकारचे त्रास या आसनाच्या सरावाने